‘माळेगाव’चा तो निर्णय हायकोर्टातही नामंजूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कुटील डाव हाणून पाडला : रंजन तावरे

पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमधील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. त्यामुळे संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे. हा कारखाना विरोधी पक्षनेते आजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो.

याआधी साखर आयुक्तांनी ‘माळेगाव’चा १० गावे जोडण्याचा पोटनियम दुरुस्ती अहवाल रद्द ठरवला होता. त्याला कारखान्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सहकार जिवंत राहण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले. माजी उपमुख्यमंत्र्यांचा कुटील डाव संपविण्यात यश आले आहे, अशी परखड टीका भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

माळेगाव वार्षिक सभेत सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे जोडण्याचा केलेला ठराव साखर आयुक्त कार्यालयाने मागील महिन्यात फेटावून लावला होता.

साखर आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील ४५ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने अपील फेटाळून लावले.

तावरे यांची पत्रकार परिषद

उच्च न्यायालय, साखर आयुक्त कार्यालयाने ‘माळेगाव’च्या प्रशासनाविरुद्ध घेतलेला ठोस निर्णय सहकार टिकण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतो, अशी भूमिका रंजन तावरे यांनी मांडली. गावे जोडण्याच्या विषय पुन्हा कोर्ट कचेरीच्या माध्यमातून सत्ताधारी संचालकांनी पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु कोर्टाने माजी उपमुख्यमंत्र्यांच्या संगनताने ४५ शेतकऱ्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. त्यांचा कुटिल डाव हाणून पाडला. हा माळेगावच्या सभासदांचा मोठा विजय आहे, असे ते म्हणाले.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दहा गावे वगळून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला माळेगावच्या सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला तरी देखील संचालक मंडळाने प्रोसिडिंग लिहून प्राथमिक सहसंचालकांकडे मंजुरीसाठी पाठवले. मात्र, प्रादेशिक सहसंचालकांनी प्रोसेसिंग नामंजूर केले. साखर आयुक्तानीही सहसंचालकांचाच निर्णय कायम ठेवला.

त्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या जिरायती भागातील अंजनगाव, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल या भागातील 45 सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात माळेगाव कारखान्याने सभासद करून घेण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सभासदांची याचिका फेटाळून लावली आहे.

यासंदर्भात कारखान्याचे माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माळेगावच्या संचालक मंडळाचा कुटील डाव न्यायालयाने हाणून पाडला असल्याचे म्हटले आहे. याचिका दाखल करताना कारखान्यातर्फे वकील नियुक्त करण्यात आल्याचा आरोप कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे यांनी केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »