गाळप हंगामाला परतीच्या पावसाचा फटका

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – 15 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे’ ऊस गाळप हंगाम सुरू झालेल्या महाराष्ट्रातील उत्साही ऊस उद्योगावर पावसाने पाणी फेरले आहे.

गाळप प्रक्रियेला एक महिना उशीर होण्याची शक्यता आहे. शेतात पाणी साचले असल्याने, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत साखर हंगाम पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या आशा आहेत.

प्रतिकूल हवामानामुळे 203 पैकी केवळ 32 साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची प्रक्रिया सुरू केली आहे.

ऑक्टोबरपर्यंत चाललेल्या ‘मान्सून’च्या परतीच्या पावसाने ऊसाच्या फडांमध्ये पाणीच पाणीच झाले , ऊस तोडणीला उशीर झाला आणि ऊसतोड मजुरांना शेजारच्या गावात स्थलांतर करण्यास भाग पाडले.

या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 ऑक्टोबरपासून उसाचे गाळप सुरू होईल, अशी घोषणा केली होती. औपचारिक परवानगी असतानाही, शेतात तुडुंब भरल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.

यावर्षी महाराष्ट्रात ऊस लागवड क्षेत्रात २.५५ लाख हेक्टरने वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी 12.32 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र 14.87 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे.

भारताच्या साखर निर्यातीमध्ये राज्याचा वाटा 60 टक्के आहे, जो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारत साधारणपणे 100 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करतो.

सलग तिसऱ्या मान्सूनमुळे पाण्याची अतिरिक्त उपलब्धता झाल्याने या हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीची निवड केली आहे. राज्यातील एकूण १.५२ कोटी शेतकऱ्यांपैकी निम्मे शेतकरी ऊस लागवड करतात. ऊसाची सर्वाधिक लागवड पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात आहे.

गेल्या वर्षी 200 साखर कारखान्यानी उसाचे गाळप केले आणि शेतकऱ्यांना रास्त मोबदला म्हणून 42,650 कोटी रुपये दिले. महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त रास्त आणि मोबदला किंमत (FRP) देणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.

केंद्राने निश्चित केलेली किमान आधारभूत किंमत 3,050 रुपये प्रति मेट्रिक टन आहे आणि सर्व राज्यांनी ती अनिवार्यपणे पाळली पाहिजे.

गेल्या वर्षी 137.36 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले. सध्याच्या हंगामात ते 138 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादनाचा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »