ओ.एस.जी.मध्ये विविध पदांसाठी भरती

पुणे : ओ.एस.जी. ग्रीन एनर्जी प्रा. लि., युनिट नं. १२, यवत, ता. दौंड, जि. पुणे येथील साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांसाठी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कारखान्याची दररोज ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असून, खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, जन्मतारखेचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, सध्याच्या पगाराची स्लिप आणि अपेक्षित पगाराची माहिती घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे.
अभियांत्रिकी विभागातील पदे
- असिस्टंट इंजिनिअर – १ पद
- इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर – १ पद
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – १ पद
- बॉयलर अटेंडंट (प्रथम श्रेणी) – ४ पदे
- फायरमन (द्वितीय श्रेणी) – ६ पदे
- टर्बाइन अटेंडंट – ३ पदे
- इलेक्ट्रिकल सुपरवायझर – १ पद
- इलेक्ट्रिशियन – २ पदे
- वायरमन ए ग्रेड – २ पदे
- स्विच बोर्ड ऑपरेटर – २ पदे
- खलाशी – २ पदे
- बॉयलिंग हाऊस फिट्टर ए ग्रेड – १ पद
- वर्कशॉप इन्चार्ज – १ पद
- सेंटर फिट्टर ए ग्रेड – २ पदे
- मिल फिट्टर ए ग्रेड – ३ पदे
- वायरमन बी ग्रेड – ४ पदे
उत्पादन विभागातील पदे
- मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट – १ पद
- ई.टी.पी. केमिस्ट – १ पद
- WTP इन्चार्ज – १ पद
- ज्यूस सुपरवायझर – ३ पदे
- कॅन्डल प्लेट मेट – ३ पदे
- सल्फिटेशन मेट – ३ पदे
- ड्रमेट – ३ पदे
- पॅन इन्चार्ज – १ पद
- असिस्टंट पॅनमन – १ पद
- सेंटरमेट – २ पदे
- सेंटर ऑपरेटर – २ पदे
लेखा विभाग
- स्टोअर & टॅक्स अकाउंटंट – १ पद
उमेदवारांकडे संबंधित पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे अपेक्षित आहे. जाहिरातीनुसार सर्व पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुलाखतीची वेळ : १६ ऑगस्ट २६ रोजी सकाळी १०.०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : ओ.एस.जी. ग्रीन एनर्जी प्रा. लि., युनिट नं. १२, यवत, ता. दौंड, जि. पुणे.
ई-मेल : [oskhr12@onkarsugars.com]
टीप: उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी जाहिरातीतील पद, पात्रता, अनुभव आणि कागदपत्रांची आवश्यकता तपासून जाणे योग्य राहील.



