खडकपूर्णा अॅग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : माणिकनगर, सिल्लोड येथील खडकपूर्णा अॅग्रो लिमिटेड या २५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संबंधित पदावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

कारखान्यात खाते-अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्टोअर्स विभागातील विविध पदे रिक्त आहेत. यामध्ये टर्नर, फिटर, सेंटरफ्यूगल फिटर, टर्बाइन ऑपरेटर, बॉयलर वॉटरमन, मिल टर्बाइन अटेंडंट, वायरमन, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, लॅब केमिस्ट, ज्यूस सुपरवायझर, पॅन इन्चार्ज, पॅनमन, वर्कशॉप मेट, ऑइलर मेट, सिलेक्शन मेट, डी.एम. प्लांट ऑपरेटर आणि स्टोअर किपर आदी पदांचा समावेश आहे.

पदानुसार आयटीआय, बी.एस्सी./एम.एस्सी. केमिस्ट्री, बारावी किंवा दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता असून, बहुतांश पदांसाठी ५ ते १० वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला नोकरी अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सध्याचा पगार यांचा तपशील १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष, पोस्ट किंवा ई-मेलद्वारे पाठवावा. अधिक माहितीसाठी एच.आर. विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई-मेल : khadakpurna1.hr@gmail.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »