श्री छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येत आहे.

कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार खालील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत :

क्र.पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
१लेबर वेल्डर ऑफिसर६संबंधित तांत्रिक पात्रता व कामाचा अनुभव आवश्यक
२सेफ्टी ऑफिसर२संबंधित अभियांत्रिकी/तांत्रिक पात्रता
३असि. मेकॅनिकल इंजिनिअर२डी.एम.ई./डी.ई. (मेकॅनिकल), बी.ई. मेकॅनिकल; बॉयलर प्राविण्य परीक्षा उत्तीर्ण
४बॉयलर अटेंडंट२एस.एस.सी./एच.एस.सी. व प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
५ऑलिव्हरमेट हंगामी)२एस.एस.सी.

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेनुसार इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मंगळवार, दिनांक १८-८-२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संपर्क : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे.
ई-मेल : scsskib@gmail.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »