पानीव येथे आज आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : पानीव (ता. माळशिरस) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज ‘स्मार्ट शेती’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धती आणि संतुलित व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा आज मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.

ऊस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, मृदा व पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, स्मार्ट सिंचन प्रणाली, उत्पादन खर्चात बचत तसेच एकरी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक पद्धती याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पुणे येथील कृषी विद्यापीठ तसेच संबंधित तज्ज्ञांनी ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जमिनीची सुपीकता, पाणी व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.

कार्यशाळेस कृषिरत्न, कृषिभूषण व शेतीनिष्ठ महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित डॉ. संजीव गणपतराव माने तसेच ऊसभूषण कार्यगौरव पुरस्कारप्राप्त प्रगतशील ऊस उत्पादक लक्ष्मणराव आप्पासो सुळ-पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »