दोन मुलांसह पाच ऊसतोड महिला मजूर ठार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ट्रॅक्टर कालव्यात कोसळला

सोलापूर : पंढरपूर जवळ करकंब येथे ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून पाच जण ठार झाले. त्यात दोन मुलांसह 3 महिलांचा समावेश आहे. ऊसतोड मजूर ऊसाच्या फडात जात असताना हा अपघात झाला.

या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधील सर्व ऊस तोड मजूर हे मध्य प्रदेशातून आले होते. कामानिमित्त जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

ट्रॅक्टरचा वेग चालकाला नियंत्रित करता आला नाही आणि हा तो करकंब परिसरात उजनी कालव्यात पडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केले.

पोलिसांनी अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »