शंभर ऊसतोड मजुरांना ब्लँकेटचे वाटप

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कंडारी तिंबोळी यांच्या वतीने शंभर ऊसतोड मजुरांना ब्लँकेटचे वाटप केले.
दरम्यान राधाताई सानप यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंडारी येथील आदेश तिंबाेळे यांच्या वतीने मंगळवारी(दि.१३) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तिंबोळे हे अनेक वर्षापासून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वेग वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करताता. यावर्षी उसाच्या फडावर जाऊन थंडीच्या दिवसांमध्ये ऊसतोड मजुरांना उबदार ब्लँकेट भेट दिले. यावेळी ऊसतोड कामगारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी दिलीप मोरजकर, वर्षद शिंदे, आप्पा तरटे, सुहास चव्हाण, अमोल कोकाटे, धनंजय गायकवाड, विठ्ठल ढगे, रुपेश ढगे, गुरुदास ढगे, पैलवान रणजीत ढगे, हरी घोगरे, अजित ढगे, नाना पडघन, चंद्रकांत डोके, हौसराव देशमुख, कुस्ती समालोचक राजाभाऊ देवकते, ग्रामपंचायत सदस्य सारंग घोगरे, संजय डांगे, परमेश्वर घोगरे, नागनाथ ढगे, नामदेव चव्हाण, आरोग्य सेवक जयश्री मुसळे उपस्थित होते.