बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; उसाच्या शेतात आढळला मृतदेह

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : घरासमोरील अंगणात लघुशंकेसाठी आलेल्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलून उसाच्या शेतात नेल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जय संदीप खंडागळे असे मृत बालकाचे नाव आहे.

जय रात्री अंगणात आल्यानंतर घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उसाच्या शेतात नेले. काही वेळाने जय अंगणात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. अंगणात रक्त आढळल्याने कुटुंबीय हादरले.रक्ताच्या खुणांचा माग घेत गावकऱ्यांनी जवळच्या उसाच्या शेतात शोध घेतला. तेथे जयचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जयला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. पाळीव कुत्रा होता पिंजऱ्यातखंडागळे यांच्या घराच्या मागील बाजूस उसाचे शेत आहे. रात्री वन्यप्राण्यांचा धोका असल्याने कुटुंबाने कुत्रा पाळला होता. घटना घडली तेव्हा तो जाळीच्या पिंजऱ्यात बंद होता. कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी बिबट्या घराजवळ दबा धरून बसला असावा, अशी शक्यता मूळ वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, जय समोर आल्याने तो बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »