अनमोल

आवडल्यास ही बातमी शेअर करा


जीवनभर कास धरावी सत्याची|
वेळ येता मान मोडावी उन्मत्तांची||
अन्यायाला थारा नसे आपल्या गावी|
सत्याची जीत कधी न डगमगावी||१||

शेवटी साथ देई तीच माणूसकी|
छोट्या कामात मोठे पुण्य असतेही||
मनात करुणा कृतीत माणुसकी|
पैशाची कमाई इथेच नडतेही||२||


दुसऱ्याचे दुःख आपुलेही मानावे|
खरा तो एकचि धर्म ओळखावे||
हृदयी प्रेम दया त्याच्या  वसावे|
त्यास खरा माणूस म्हणुनी बघावे||३||


माणूस विचाराने थोर होतो नित्य|
संपत्तीने नव्हे गुणाने मोठा होतो||
सत्य श्रम निष्ठेने मोठा होतो जीवनी|
त्याच्या यशाच्या किर्तीने तो मोठा होतो||४||


स्वार्थाची  किंमत कवडीमोल व्हावी|
म्हणून सत्याची साथ नित्य धरावी||
दुजास दिले ते अनमोल  ठरावे|
हीच रीत शेवटी खरीच ठरावी||५||

कवी – इंजिनिअर वाळू आहेर (नाशिक)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »