|| आरती नेत्याची ||

बहु दुर्गुणी मुर्ती नेता हा जाणा|
बाहेरख्याली हा अवतारी राणा ||
एक एक शब्द असे यांचा उना|
टोळी ही दुर्जनांची न येई ध्याना||१||
आम्ही आरतीत दक्षिणा टाकता|
नाही यांला मग कशाचीही चिंता||
सबाह्य अंतरी तो हा नामी धुर्त|
अभाग्यासी कैशी कळेल ही मात॥२||
जेलातून परतली यांची स्वारी|
तेथें होई किरकोळ मारामारी||
केली सोय पुढच्या सात पिढ्यांची|
जाण नाही याला मायबहीणीची||३||
अर्ध्या रात्री येऊन उभा ठाकला|
आज रात्री मुक्काम कुठे ठेवला?||
खाणाखुणा होता ,आशीर्वाद दिला|
रात्री राडा कसातरी चुकविला||४||
भाऊ भाऊ ऐसे लागलेय ध्यान|
हरपले हे मन, झाले उन्मन ॥
मी तू पणाची केलीय बोळवण|
लगेच मिळे मलिदा पटकन||५||
इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक






