उठ मुला!

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|चिमणीताईने चिवचिव केलं||उठी उठी लवकरी मम सुता|बाहेर तांबडं फुटलंय आता||१|| कळ्यावर फुलपाखरू डोले|गारव्याने मन आनंदाने फुले||आजीआजोबा फिरुन परतले|मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२|| काकांनी देवपुजा अर्चना केली|ताई दादाची पण आंघोळ झाली||बाबांची हाक ऐकू न आली तुला|निघ नां वेळेवर बाळ शाळेला||३|| उठा,स्नान करा,अन नाश्ता…













