Category पश्चिम महाराष्ट्र

ऊसतोड मजूर पुरवठा करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

इस्लामपूर(ईश्वरपूर) : ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्याचे आमिष दाखवून कामेरी (ता. वाळवा) येथील एका व्यावसायिकाला ८ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मोहन जयसिंग राठोड (रा. बाराकोटी तांडा, जि. विजापूर) याच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात…

शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकेल : बोत्रे पाटील

पुणे/श्रीगोंदा: “शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करून त्यांना उसाचा योग्य मोबदला दिला, तरच साखर उद्योग भविष्यात टिकू शकेल,” असे मत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज (युनिट४) कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी…

ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

Health Camp Shrinath Mhaskoba Sugar

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

ऊसतोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक; १० जणांवर गुन्हा

सांगली : राज्‍यात सध्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. यासाठी मजुरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कवठेपिरान येथील अनिकेत वडगावे या तरुण शेतकऱ्याला जळगावच्या एका टोळीने सव्वा सहा लाखांचा चुना लावला आहे. अनिकेत वडगावे यांनी संशयित १० जणांविरोधात सांगली…

‘महा -सहकार’चे प्रकाशन

Mangesh Titkare

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

माणगंगा कारखान्यात चोरीचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकावर हल्ला

सांगली : आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात २७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीचा मोठा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कारखान्यातील सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी सुरक्षा रक्षकावर हल्लाही केला. आटपाडी पोलिसांनी तातडीने…

केन ॲग्रो कारखान्याकडून १८.८३ कोटींची थकबाकी वसूल

सांगली : कर्जवसुलीसाठी संघर्ष करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने आपल्या थकीत कर्जाचा पहिला हप्ता १८ कोटी ८३ लाख रुपये व्याजासह बँकेत जमा केला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT)…

Select Language »