Category पश्चिम महाराष्ट्र

कारखान्याने केलेल्या हृद्य सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली : रासकर

D M Raskar Felicitation by Shrinath Sugar

मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर अभीष्टचिंतन सोहळा पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने केलेल्या माझ्या हृद्य सत्कार सोहळ्यामुळे मी भारावून गेलो आहे, या कार्यक्रमामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे, मी त्यास नव्या ऊर्जेने न्याय देईन, असे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी…

‘सोमेश्वर’च्या अपहारप्रकरणी दोघे बडतर्फ, चौघे पुन्हा सेवेत

Someshwar Sugar

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफिसद्वारे झालेला अपहारप्रकरणी कामगार रूपचंद साळुंखे व कामगार अधिकारी दीपक निंबाळकर या दोघांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार केल्यानंतर कारखान्याने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली होती. चौकशीचा अहवाल शनिवारी (ता. १६)…

कुकडी कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

kukadi sugar file image

अहिल्यादेवीनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी आपल्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन करत आहेत. श्रीगोंद्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून (सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखाना) ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी या मागणीसाठी त्यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनापासूनच आमरण उपोषण सुरू…

ऊस वाहतूकदाराला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा

सांगली : ऊसतोड कामगार पुरविण्याचा बहाणा करून एका वाहतूकदाराला  तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील संशयिताविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण आडे (रा. कुहा, ता. रिसोड, जि. वाशिम)  असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव…

ऊसबील थकल्याने अक्कलकोटच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : कारखान्याकडे ऊसबील थकल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सुनील चिवडाप्पा कुंभार असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी याने विषारी द्रव्य प्राशन केले होते.…

साखर उद्योगातील कामगारांना नवीन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची गरज

W. R. Aher speaks at Thorat Sugar Mill

 नामवंत साखर तंत्रज्ञ वाळू आहेर यांचे प्रतिपादन अहिल्यानगर :  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर, (संगमनेर) येथे नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणांतर्गत नामवंत साखर  उद्योग तंत्रज्ञ वाळू रघुनाथ आहेर यांनी नुकतेच मार्गदर्शन केले. “शुन्य टक्के मिल बंद तास” आणि “हाय प्रेशर…

शुद्ध व प्रमाणित ऊस बियाणाचा वापर करा : डॉ. विवेक भोईटे

सातारा : शेतकऱ्यांनी माती तपासणी करावी आणि जमिनीतील कर्ब वाढवणे आवश्यक आहे याकरिता उसाचे पाचट न जाळता ते जमिनीत मिक्स करावे. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध व प्रमाणित केलेल्या ऊस बियाणाचा वापर करावा आणि पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा, असे आवाहन वसंतदादा…

ऊस वाहतूकदाराची आर्थिक फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

सातारा : कराड येथील एका ऊस वाहतूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तिघांवर कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विक्रम काळे (रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), अशोक शिवाजी देवकाते (रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि राजकुमार पिंक्या…

यशवंत कारखान्याच्या जमीनविक्रीस विरोधच; संबंधितांच्या गैरकारभाराची चौकशी करा

यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे साखर आयुक्तांना निवेदन पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना विश्वासात न घेता जमीनविक्रीची मनमानी प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेस आमचा तीव्र विरोध आहे. संबंधितांच्या गैरकारभाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करावी, अशी…

भीमाशंकर कारखान्याकडून ३२९० रुपये ऊसदर जाहीर

Bhimashankar Sugar

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव, मंचर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिमेट्रिक टनसह अंतिम ऊसदर ३ हजार २९० रुपये प्रतिमेट्रिक टन जाहीर केला आहे, त्यामुळे कारखाना परिसरातील सभासद, ऊस…

Select Language »