छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

बीड : भारतीय सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. मध्ये 2500 टन प्रतिदिनी गाळप क्षमतेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुलाखतीचा तपशील
मुलाखतीचा दिनांक : 15/07/2026, बुधवार
वेळ : सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
ठिकाण : छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड
पात्रता व अटी :
सदर पदांसाठी संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असले उमेदवार पात्र राहतील. उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी संपूर्ण बायोडाटा, शैक्षणिक पात्रता, एकूण अनुभव, अपेक्षित पगार व सध्याचा पगार स्लीप सोबत आणणे आवश्यक आहे.
पदांची माहिती :
- इंजिनिअरिंग विभाग
- असि. मेकॅनिकल इंजि. – 1 पद – बी.ई. मेकॅ. / डी.एम.ई. + व्ही.एस.आय. कोर्स पास
- मिल फिटर ए ग्रेड – 2 पदे – आय.टी.आय.
- सेट्रीफ्युगल फिटर ए – 2 पदे – आय.टी.आय.
- वायरमन ए ग्रेड – 2 पदे – आय.टी.आय. वायरमन परीक्षा पास
- वायरमन बी ग्रेड – 3 पदे – आय.टी.आय. वायरमन परीक्षा पास
- बॉयलर अटेंडंट – 2 पदे – फर्स्ट क्लास परीक्षा पास
- खलाशी – 2 पदे – 10 वी पास
- उत्पादन विभाग
- सल्फिटेशन मेट – 2 पदे – 10 वी / 12 वी पास
- ऑलिव्हर मेट – 2 पदे – 10 वी / 12 वी पास
- डॉ. सेंटीमेट – 2 पदे – 10 वी / 12 वी पास
- बेंच टाईप ऑपरेटर – 2 पदे – 10 वी / 12 वी पास
टीप : अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
ईमेल : chhatrapati.sonasakhar@gmail.com
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारीख व वेळेनुसार मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



