अपघातात ४ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील शेडगेवस्ती परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. वीर-सारोळा रस्त्यावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये हरीश बरडे, प्रदीप भोये, अमित चौधरी आणि मुरलीभाई महाला (सर्व रा. डांग, गुजरात) यांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक पसार झाला असून सासवड पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »