गंगामाऊली शुगरकडून विविध कामांसाठी निविदा जाहीर
अमळनेर : गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि., आसोडा नगर, उमरेड, जि. जळगाव येथील कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी विविध कामे करण्यासाठी अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत.
या निविदांमध्ये बॉयलरमधील बगॅस काढण्याचे काम, मिल गाळे मारण्याचे काम, बॉयलर राख हाताळणी व विक्री, शुगर हाऊसमध्ये गोणीत हमाली, चुना गंधक हाताळणी, प्रेसमड हाताळणी व वाहतूक, प्रेसमड विक्री, ईटीपी प्लांट चालविणे, गळतीत उसाचा पुरवठा तसेच कॅन यार्ड परिसरातील काटा साफसफाई आदी कामांचा समावेश आहे.
निविदा फॉर्म कारखाना प्रशासन कार्यालयात १९ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील. निविदा फॉर्मची किंमत १ हजार रुपये अधिक जीएसटी अशी निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक कंत्राटदारांनी अनुभव प्रमाणपत्र, पॅन कार्ड, लेबर लायसन्स, पीएफ लायसन्स आणि जीएसटी नोंदणीची कागदपत्रे जोडून निविदा बंद पाकिटात २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कारखाना प्रशासन कार्यालयात जमा कराव्यात.
कारखाना प्रशासनाने कोणतेही कारण न देता निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. संबंधित कामांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या कंत्राटदारांनाच निविदा फॉर्म देण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.




