देसाई कारखान्यात ‘कार्यकारी संचालक’ पदासाठी भरती

सातारा : दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. येथे आमचे प्रतिदिन २५०० मे. टन गाळप क्षमतेच्या कारखान्यासाठी ‘कार्यकारी संचालक’ या पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदासाठी साखर कारखान्यात सदर पदाचा किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनिअरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग विभागातील संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव व पत्ता, शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार आणि जन्मतारीख यासह आवश्यक कागदपत्रे जोडून आपला अर्ज maralisugar2021@gmail.com या मेल आयडीवर दिनांक २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावा.
या भरती प्रक्रियेत अनुभवी तसेच अनुजाती/जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पत्ता : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर
ता.पाटण जि. सातारा
ई-मेल- maralisugar2021@gmail.com



