गुरु पौर्णिमा

आज बुधवार, जुलै २९, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर श्रावण ७, शके १९४८
सूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६
चंद्रोदय : १९:२० चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शक सम्वत : १९४८ पराभव
संवत्सर : पराभव
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माहआषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – २०:०५ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – १५:३७ पर्यंत
योग : प्रीति – २३:५८ पर्यंत
करण : विष्टि – ०७:१४ पर्यंत
द्वितीय करण : बव – २०:०५ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १२:४५ ते १४:२३
गुलिक काल : ११:०७ ते १२:४५
यमगण्ड : ०७:५२ ते ०९:३०
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१९ ते १३:११
अमृत काल : ०८:३४ ते १०:२०
वर्ज्य : १९:५८ ते २१:४२
॥ गुरु वंद्य महान भगवा एकचि जीवन प्राण
अर्पण कोटी कोटी प्रणाम ॥
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर…
गुरूंचाच प्रभाव असतो आपल्या रहाण्या आणि वागण्या – बोलण्यावर…
गुरूच दूर करीत असतात जळमटे जमलेली आपल्या बुध्दीवर…
गुरूच शिकवत असतात आपल्याला विश्वास ठेवायला स्वतःवर…
गुरूच देतात वळण आपल्या जगण्याला घेऊन जातात यशाच्या शिखरावर…
गुरूच दाखवितात मार्ग आपल्याला सत्याची कास धरूण जाण्याचा मोक्षाच्या मार्गावर…
गुरूच देतात ताकद सर्वांना मात करण्याचीजीवनातील प्रत्येक संकटावर…
म्ह्णूनच गुरूपौर्णिमेच्या दिवशी वाहू याआपली निष्ठा, प्रेम, आदर आणि समर्पकता त्यांच्या चरणावर …
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥
“आज व्यास पौर्णिमा – गुरु पौर्णिमा आहे”
जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
आज आतंरराष्ट्रीय ‘व्याघ्र’ दिन आहे.
आज विषमता विरोध दिन आहे.
जे. आर. डी. टाटा यांनी १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला.
टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.
टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.
१९०४ : ज्येष्ठ भारतीय उद्योजक, भारतातील पहिले वैमानिक तसेच भारतीय हवाई वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॊय यांचा जन्म ( मृत्यू : २९ नोव्हेंबर, १९९३ )
शि.द. फडणीस – जे.जे.मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि.द. फडणीस हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले. तेंव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली.
पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदेंनी केला.
त्यांची अनेक चित्रे इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यांचे हसरी गॅलरी , ‘चित्रहास’, ‘चिमुकली गॅलरी’ ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत..
आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणिसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.
चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि.द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले.
१९२५ : विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटणारे ज्येष्ठ व्यंग चित्रकार शी. द. फडणीस ( यांचा जन्म) त्यांना जन्मदिनाच्या” हार्दिक शुभेच्छा ”
- घटना :
१८५२ : पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाचे उद्गाते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा सन्मान करण्यात आला
१८७६ : फादर आयगेन, डॉ . महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ची स्थापना केली.
१९२० : जगातील पहिली टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रन्सिस्को या शहरा दरम्यान सुरु झाली.
१९४६ : टाटा एअर लाईन्स चे एअर इंडिया असे नामकरण झाले
१९५७ : इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी ची एजन्सी ची स्थापना झाले.
१९८७ : भारत श्रीलंका ह्या देशांमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या
२०१९ : तत्काळ तिहेरी तलाक’ किंवा ‘तलाक-उल-बिद्दत’ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही ऐतिहासिक तीन तलाक विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. ९९ विरुद्ध ८४ मताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.
• मृत्यू :
•१८९१ : पं. ईश्वरचन्द्र विद्या सागर यांचे निधन ( जन्म : २६ सप्टेंबर, १८२० )
•१९८७ : लेखक, कवी, नाटककार बिभूतिभूषण मुखोपाध्याय यांचे निधन ( जन्म : २४ ऑक्टोबर, १८९४ )
•१९९६ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित (मरणोत्तर)स्वातंत्र्य सेनानी, अरुणा असिफ अली यांचे निधन ( जन्म : १६ जुलै, १९०९ )
•२००२ : गायक, संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे निधन ( जन्म : २५ जुलै, १९१९ )
२००३ : दारूच्या थेंबालाही स्पर्श न करता अनेक चित्रपटात दारुड्याची भूमिका जिंवंत करणारे, हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचे निधन ( जन्म : ११ नोव्हेंबर, १९२६ )
•२००६ : मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ . निर्मल कुमार फडकुले यांचे निधन ( जन्म : १६ नोव्हेंबर, १९२८ )
•२००९ : जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री माता यांचे निधन ( जन्म : २७ मे, १९१९ )
- जन्म :
• १९२२ : लेखक , शिवचित्राचे अभ्यासक शिवशाहीर ब. मो. उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म . ( मृत्यू : १५ नोव्हेंबर, २०२१ )
१९५३ : भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.






