आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

शुक्रवार, ऑक्टोबर २, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १०, शके १९४८
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌅 सूर्योदय : ०६:२९
🌇 सूर्यास्त : १८:२६
🌙 चंद्रोदय : २३:०९
🌙 चंद्रास्त : ११:५६
शक संवत : १९४८ पराभव
चंद्रमास : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
🔸 तिथी : षष्ठी — १०:१५ पर्यंत
🔸 नक्षत्र : मृगशीर्ष — ०२:५५, ऑक्टोबर ०३ पर्यंत
🔸 योग : व्यतीपात — १८:१८ पर्यंत
🔸 करण : वणिज — १०:१५ पर्यंत
🔸 द्वितीय करण : विष्टि — २१:०६ पर्यंत
🔸 सूर्य राशी : कन्या
🔸 चंद्र राशी : वृषभ — १५:४० पर्यंत
⏰ राहुकाल : १०:५८ ते १२:२८
⏰ गुलिक काल : ०७:५९ ते ०९:२८
⏰ यमगण्ड : १५:२७ ते १६:५७
✨ अभिजित मुहूर्त : १२:०४ ते १२:५२
⚠️ दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४०
⚠️ दुर्मुहूर्त : १२:५२ ते १३:३९
🌸 अमृत काल : १८:४० ते २०:१०
🔹 वर्ज्य : ०९:४१ ते ११:११
━━━━━━━━━━━━━━━━━━
📖 ॥ आजचा ज्ञानेश्वरी विचार ॥
॥ भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी ।
कृपा करी हरी तयावरी ॥
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु ।
श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेशी ॥
ग्रंथशुद्धी प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य षष्ठीचा होता. त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी या दिवशी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ साजरी करतात.
🌺 आज ज्ञानेश्वरी जयंती आहे.

भाद्रपद कृष्ण षष्ठी (किंवा वद्य षष्ठी) हा दिवस वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी जयंती (ज्ञानेश्वरी परिष्करण दिन) म्हणून मोठ्या श्रद्धाभावाने साजरा केला जातो. संत एकनाथ महाराजांनी पैठण येथे ज्ञानेश्वरी ग्रंथशुद्धी (परिशोधन) करण्याचे कार्य या तिथीला पूर्ण केले होते, म्हणून हा दिवस ग्रंथाची जयंती म्हणून पाळला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌍 आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन / स्वच्छता दिन / बाल सुरक्षा दिन आहे.
महात्मा गांधींनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे :
१. अहिंसा
२. सत्य
३. अस्तेय
४. ब्रह्मचर्य
५. अपरिग्रह
६. शरीरश्रम
७. आस्वाद
८. सर्वत्र भयवर्जन (निर्भयता)
९. सर्वधर्म समानत्व (सर्वधर्म समभाव)
१०. स्वदेशी
११. स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग)
निर्भयता या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते, निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते.
महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने प्रभावित होऊन, “असा हाडामासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही,” असे गौरवोद्गार प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काढले होते.
🇮🇳 १८६९ : मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर, गुजरात येथे जन्म.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 “जय जवान – जय किसान”

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे, खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले.
त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपल्या गुरू महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले, “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.”
महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.
निष्कलंक चारित्र्याच्या शास्त्रीजींची लोकप्रियता १९६५ मधील युद्धातील भारताच्या विजयामुळे प्रचंड वाढली होती. “मूर्ती लहान, पण कीर्ती महान” असे त्यांचे वर्णन पाश्चात्त्य देशांनी केले होते.
१९६२ च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता. भारताची काही भूमी चीनने बळकावली होती. देशाची जगभरात मानहानी झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान यांनी युद्धाच्या मार्गाने काश्मीर जिंकण्यासाठी १९६५ मध्ये भारताविरुद्ध युद्ध सुरू केले. अवघ्या आठ दिवसांच्या आत जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरवर पाकिस्तानी लष्कराचा झेंडा फडकेल, अशी स्वप्ने अयूब खान आणि त्यांचे तत्कालीन सहकारी परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो पाहत होते.
प्रत्यक्षात मात्र उलटच घडले. शास्त्रीजींनी भारतीय भूमीवर आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा मुकाबला तर केलाच, पण पाकिस्तानी भूमीतही प्रतिआक्रमण करण्याचा आदेश लष्कराला दिला होता. भारतीय लष्कराने अवघ्या २१ दिवसांच्या त्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचा जोर मोडून काढला.
🇮🇳 १९०४ : भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई, उत्तर प्रदेश येथे जन्म.
(मृत्यू : ११ जानेवारी, १९६६)
🙏 महात्मा गांधी व भारतरत्न पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महात्म्यांना विनम्र अभिवादन.
━━━━━━━━━━━━━━━━━━
📜 ॥ घटना ॥
🔹 १९०९ : रमाबाई रानडे यांनी पुण्यात सेवासदन संस्थेची स्थापना केली.
🔹 १९२५ : जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
🔹 १९५५ : पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू केली.
🔹 १९५८ : गिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
🔹 १९६७ : थर्गूड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
🔹 १९६९ : महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून रिझर्व्ह बँकेने त्यांची प्रतिमा व सही असणाऱ्या २, ५, १० व १०० रुपयांच्या चलनी नोटा वापरात आणल्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━
⚫ ॥ मृत्यू ॥
🔸 १९०६ : चित्रकार राजा रवि वर्मा यांचे निधन.
(जन्म : २९ एप्रिल, १८४८)
🔸 १९७४ : भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचे निधन.
(जन्म : ११ सप्टेंबर, १८८४)
🔸 १९७५ : स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचे निधन.
(जन्म : १५ जुलै, १९०३)
🔸 १९८२ : भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे निधन.
(जन्म : १४ जानेवारी, १८९६)
🔸 २०२१ : ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे निधन.
(जन्म : १४ एप्रिल, १९२७)
🔸 २०२२ : भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते अटलास रामचंद्रन यांचे निधन.
(जन्म : ३१ जुलै, १९४२)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌺 ॥ जन्म ॥
🔹 १८९१ : पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म.
(मृत्यू : १३ जून, १९६७)
🔹 १९०८ : विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण तथा गं. बा. सरदार यांचा जन्म.
(मृत्यू : १ डिसेंबर, १९८८)
🔹 १९२७ : शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म.
(मृत्यू : २३ जानेवारी, २०१०)
🔹 १९४२ : चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.
🔹 १९४८ : अभिनेत्री व लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म.
(मृत्यू : १८ ऑगस्ट, १९९८)






