राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार प्रदान; महाराष्ट्राची सर्वाधिक पारितोषिके

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठीचे पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. देशभरातील सहकारी साखर कारखान्यांनी या पुरस्कारांमध्ये सहभाग घेतला होता.

सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार २०२४-२५ साठी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, तर २०२५-२६ साठी सांगली जिल्ह्यातील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला प्रदान करण्यात आला. महासंघाने एकूण 57 पारितोषिके जाहीर केली असून, त्यात महाराष्ट्राने सर्वाधिक पारितोषिके मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

जागतिक दर्जाच्या कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाबरोबरच जैवइंधन आणि जैवऊर्जेकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इथेनॉलबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यासाठी त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »