साखरेपासून इकोफ्रेंडली प्लास्टिक

साखर-आधारित सामग्री एकल-वापराच्या प्लास्टिकची जागा घेऊ शकते
ACS सस्टेनेबल केमिस्ट्री अँड इंजिनिअरिंग जर्नलमधील अहवालानुसार, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची सामग्री तयार केल्याचा दावा केला आहे. ही सामग्री सामान्यतः हॉटेलसारख्या अन्न सेवा उद्योगात आणि तात्पुरत्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्या एकल-वापराच्या प्लास्टिकला पर्याय ठरू शकतो.
साखर आणि विशिष्ट लाकडाच्या पावडरपासून बनविलेले हे साहित्य हलके असते, आणि तुमच्या गरजेनुसार त्याचे विघटन करता येऊ शकते, ज्यामुळे ते पारंपरिक प्लास्टिकला एक आशादायक पर्याय बनते, असे या शास्त्रज्ञांचे मत आहे. एकल वापराच्या प्लास्टिकचे विघटन व्हायला अनेक वर्षे लागतात.
संशोधकांनी सेल्युलोज आणि भूसा किंवा लाकूड पावडर यासारख्या नैसर्गिक पदार्थांसोबत साखरेपासून तयार होणारे आयसोमाल्ट सारखे अल्कोहोल एकत्र केले. नंतर त्यांनी मिश्रण गरम केले. त्यातून प्लेट, वाट्या असे साहित्य बनवले. ही नवीन सामग्री मजबूत तर आहेच, शिवाय काही मिनिटांत विरघळते, त्यामुळे ती एकल-वापराच्या प्लास्टिकची जागा घेऊ शकते, ते सामान्य प्लास्टिकपेक्षा खूप मजबूत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी सुचवले आहे की, ही नवीन सामग्री अन्न-सेवा वस्तू आणि तात्पुरत्या सजावटीसाठी वापरली जाऊ शकते. नंतर त्याची पाण्यात बुडवून सहजपणे विल्हेवाट लावली जाऊ शकते. चार-पाच दिवसांत ती पाण्यात विरघळून जाते.
जरी या वस्तू कुठेही पडल्या, तरी त्याचा पर्यावरणावर काहीही वाईट परिणाम होत नाही, कारण त्या साखर आणि वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये मोडतात, जे मातीसाठी फायदेशीर असू शकते.