तुळजाई शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

धाराशिव : जिल्ह्यातील हावरगांव (ता. कळंब) येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता तसेच अपेक्षित वेतनाची माहिती नमूद करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दि. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये डिस्टिलरी, रासायनिक (केमिकल) आणि इंजिनिअरिंग विभागांतील विविध पदांचा समावेश असून, केमिस्ट, ऑपरेटर, इंजिनिअर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फायरमन आदी पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे, तर काही तांत्रिक पदांसाठी ITI/10वी/12वी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतील.
एकूण उपलब्ध पदांमध्ये इंजिनिअरिंग आणि तांत्रिक कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
साखर उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या भरतीचा लाभ घेण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.



