संभाजी कडू : वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रशासकीय सेवेत आपली खास छाप पाडणारे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी कडू पाटील (आयएएस) हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक आहेत. त्यांचा २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा…!

श्री. कडू पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी त्यासाठी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कायदा आणि व्यवसाय प्रशासनात पदवी संपादन केली.

ते जून 1985 मध्ये ‘डेप्युटी कलेक्टर’ म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले आणि 1998 मध्ये भारतातील प्रमुख नागरी सेवा मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) नामनिर्देशन झाले. भारत आणि परदेशात, विशेषत: यूएसए, कॅनडा आणि यूकेमध्ये त्यांनी शासन आणि सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.

श्री. कडूपाटील यांची प्रशासकीय कारकीर्द 37 वर्षांहून अधिक काळ राहिली. त्यांनी भूषवलेली महत्त्वाची पदे पुढीलप्रमाणे…

जिल्हा परिषद सातारा व लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी , तसेच या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी… विशेष आयुक्त, विक्रीकर, सचिव, मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य, सेटलमेंट कमिशनर आणि भूमी अभिलेख संचालक, साखर आयुक्त.
30 नोव्हेंबर 2018 रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते विविध संस्थांशी संलग्न आहेत. ते जून २०२१ मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) मध्ये ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD)’ म्हणून रुजू झाले. 01 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची VSI चे ‘महासंचालक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून या संस्थेला आणखी नावारूपास आणण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
त्यांना पुन्हा एकदा ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »