डी. जी. हेर्लेकर यांचे निधन

परभणी : पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक डी. जी. हेर्लेकर यांचे कर्करोगाने शनिवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्णा साखर कारखाना परिसरासह सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ते दीर्घकाळ कारखान्याच्या तांत्रिक व्यवस्थापनाशी निगडित राहिले होते.
डी. जी. हेर्लेकर यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्यात सुरुवातीला १० वर्षे चीफ केमिस्ट, १५ वर्षे कार्यकारी संचालक, १० वर्ष तज्ञ संचालक म्हणून तब्बल ३५ वर्षे कार्य केले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कारखान्याच्या तांत्रिक कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देत गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी वर्गात त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना होती.
काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ‘शुगरटुडे’ची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.






