विलास सहकारी कारखान्यात विविध पदांसाठी भरती

लातूर : जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तोंडार येथे असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना (युनिट-२) मध्ये विविध तांत्रिक व उत्पादन विभागातील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज ई-मेलद्वारे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागात सिनिअर इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर तसेच फिटर पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी संबंधित शाखेतील बी.ई./डिप्लोमा किंवा आयटीआय पात्रता आवश्यक असून साखर उद्योगातील किमान ५ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
उत्पादन विभागात बॉयलर मेट, सेंट्रीफ्यूज ऑपरेटर, सल्फिटेशन मेट-हेल्पर आणि पॅनमन-हेल्पर पदांसाठीही संधी उपलब्ध आहे. यासाठी एच.एस.सी. शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
डिस्टिलरी विभागात फिटर आणि वेल्डर (आर्गन) पदांसाठी आयटीआय पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच शेती विभागात ऊस विकासाशी संबंधित पदासाठी बी.एस्सी./एम.एस्सी. (अॅग्री) पात्रता आवश्यक आहे.
सर्व पदांसाठी साखर कारखान्यातील संबंधित क्षेत्रातील किमान ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज vilassugar2.lwo@gmail.com या ई-मेलवर निर्धारित तारखेपर्यंत पाठवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



