पवार यांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन आपण निवृत्त होत होत आहोत, असे ज्येष्ठ नेते आणि साखर क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व शरदर पवार यांनी मंगळवारी मुंबईत जाहीर केले. यावेळी सौ. प्रतिभा पवारसुद्धा भावूक झालेल्या दिसल्या.

पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे घर काँग्रेसच्या नव्हे, तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले.

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले. मग महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला.

युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड झाली. मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला आम्ही गेलो तेव्हा जपानच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम करायला मिळाले. त्यावेळी जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यलयात काम करण्याची संधी मिळाली.

१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे, असे सांगताना ‘आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत आहोत’, असे पवार यांनी नमूद करताचा, कार्यकर्त्यांनी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी घोषणाबाजी सुरु केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »