भोगावतीच्या विविध करारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांची माहिती
कौलव : शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी हंगामातील ऊस तोडणी-ओढणी कराराचा प्रारंभ नुकताच हळदी येथे कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील (देवाळेकर) यांच्या हस्ते व संचालक बी. ए. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या करारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
कारखान्याने सर्व गट कार्यालयांमध्ये वाहनधारक व टोळीधारकांचे करार करून घेण्यास सुरुवात केली आहे. कुरुकली येथे कारखान्याचे संचालक शिवाजीराव कारंडे, पांडुरंग पाटील यांच्या उपस्थितीत करारांचा प्रारंभ करण्यात आला. आवळी बुद्रुक येथे उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी रोहित पाटील, भरत आमते, बबन आमते, एम. बी. पाटील, साताप्पा पाटील, तुकाराम डेळेकर, प्रकाश पाटील उपस्थित होते. आगामी हंगामात कारखाना सहा लाख टन ऊस गाळप करणार असून सर्वांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले.
यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, शेती अधिकारी एस. बी. चरापले, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह अधिकारी, ऊसतोडणी वाहतूकदार व शेतकरी उपस्थित होते.