साखरेचे दर सात हजारांच्या विक्रमी पातळीवर!

आवडल्यास ही बातमी शेअर करा
ग्राहकांना बसतेय दरवाढीची झळ

पुणे : देशपातळीवरील साखर व्यापारात मोठी तेजी निर्माण झाली असून, सट्टेबाजांनी बाजारात सक्रिय सहभाग घेतल्याने साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे १३० रुपयांनी वाढले असून, गुरुवारी सायंकाळी ते ६ हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

शुक्रवारीही बाजारात तेजी

शुक्रवारी बाजारातही तेजी कायम राहिली. प्रतिक्विंटल दरात आणखी वाढ होत ७२ रुपयांची तेजी नोंदविण्यात आली. त्यामुळे साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून, बाजारातील वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या दरवाढीची झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारकडून साखरेचा अतिरिक्त कोटा खुला करण्यात येणार असल्याची चर्चा असतानाच बाजारातील तेजी आणखी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल दर सुमारे ५७०० रुपये होता. मात्र, वाढती मागणी आणि सट्टेबाजांची सक्रियता यामुळे दरात वेगाने वाढ झाली आहे.

दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त साखर कोटा जाहीर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. बाजारातील घडामोडींनंतर साखरेच्या दरात तेजी कायम राहिली असून, सकाळी ६१०० रुपये प्रतिक्विंटल असलेला दर सायंकाळपर्यंत ५ बाजारपेठांत ६७०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला.

दरम्यान, केंद्र सरकारकडून कच्च्या साखरेच्या आयातीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या निर्णयामुळे बाजारातील तेजीला ब्रेक लागतो का, याकडे आता साखर उद्योगासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »