आज जागतिक शिक्षक दिन

आज सोमवार, ऑक्टोबर ५, २०२६
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर अश्विन दिनांक १३, शके १९४८
🌅 सूर्योदय : ०६:३०
🌇 सूर्यास्त : १८:२४
🌙 चंद्रोदय : ०२:२१, ऑक्टोबर ०६
🌙 चंद्रास्त : १४:४४
शक संवत : १९४८ पराभव
संवत्सर : पराभव
दक्षिणायन
ऋतू : वर्षा
चंद्रमास : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी – ०२:०७, ऑक्टोबर ०६ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – २३:०९ पर्यंत
योग : शिव – ०९:५१ पर्यंत
करण : वणिज – १४:५८ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०२:०७, ऑक्टोबर ०६ पर्यंत
सूर्य राशी : कन्या
चंद्र राशी : कर्क
राहुकाल : ०७:५९ ते ०९:२८
गुलिक काल : १३:५६ ते १५:२५
यमगण्ड : १०:५८ ते १२:२७
अभिजित मुहूर्त : १२:०३ ते १२:५१
दुर्मुहूर्त : १२:५१ ते १३:३८
दुर्मुहूर्त : १५:१३ ते १६:०१
अमृत काल : १७:०२ ते १८:३४
वर्ज्य : ०७:५२ ते ०९:२४
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌏 दिनविशेष
आज जागतिक शिक्षक दिन आहे.
युनेस्को (UNESCO) तर्फे १९९४ पासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.
५ ऑक्टोबर १९६६ रोजी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) शिक्षकांच्या हक्कांसंबंधी नियम ठरवले होते.
शिक्षकांचे समाजातील स्थान उंचावणे आणि त्यांना सन्मान देणे, हा या दिनाचा उद्देश आहे.
आज आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन आहे.
सरकारी व बिगरसरकारी पातळ्यांवरून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येतात. महिला व बालकल्याण संचालनालयामार्फत मुलींसाठी प्रमाणित शाळा तसेच महिला संरक्षणगृहे स्थापन केली आहेत. या ठिकाणी सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन व नवजीवन उभारणीचे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून असे प्रयत्न करण्यात येतात.
कोलकाता येथे नोव्हेंबर २००० साली वारांगनांची परिषद झाली. या परिषदेस आशिया खंडातील अनेक देशांतील वेश्या उपस्थित राहिल्या. वेश्यांचे ‘माणूस’ म्हणून हक्क जपण्यासाठी व समाजात मिळणारी उपेक्षा कमी करण्यासंबंधी या परिषदेत आवाज उठविण्यात आला. या परिषदेचे संयोजन दुर्बार महिला समन्वय समिती या बंगालमधील महिलांच्या संस्थेने केले. येथील ‘सोनागाची’ प्रकल्पाद्वारे महिलांना एड्सबाबत माहिती मिळते.
━━━━━━━━━━━━━━━━━━
📜 स्मृतिदिन
“आज मानव का सुनहला प्रात है,
आज विस्मृत का मृदुल आघात है;
आज अलसित और मादकता-भरे,
सुखद सपनों से शिथिल यह गात है;”
— भगवतीचरण वर्मा
- १९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन.
(जन्म : ३० ऑगस्ट १९०३)
━━━━━━━━━━━━━━━━━━
भास्करराव कळंबी … नावाचा हा कर्मवीर खरंच कुठल्या धुळीतून निपजला होता, माहीत नाही. दादरासारख्या शुद्ध मराठी वातावरणात वावरलेला हा बुद्धिमान स्वयंसेवक १९४६ साली वकिली पास करून प्रचारक म्हणून कुठे गेला, तर केरळमध्ये!!
ख्रिश्चन, मुस्लिम आणि कम्युनिस्ट अशा संघाच्या म्हणजेच हिंदुत्वाच्या वैचारिक शत्रूंनी अक्षरशः वाटून घेतलेल्या आणि या साऱ्या शत्रूंच्या सामूहिक अत्याचाराने भरडून निघालेल्या केरळमधील हिंदू समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे खडतर आव्हान त्यांनी ज्या पद्धतीने पेलले, तो तर एक दैदीप्यमान इतिहासच आहे.
केरळमध्ये गेल्यानंतर भास्कररावांनी काही महिन्यांमध्येच मल्याळम भाषा अवगत केली, आपला पेहराव बदलला, खानपानात बदल घडवून आणला… थोडक्यात, भास्कररावांनी आपल्यामध्ये एवढे अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणले की के. भास्करन या नावाने ते कधी ओळखले जाऊ लागले, ते लक्षातही आले नाही.
हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुस्लिमांची दादागिरी मोडीत काढली. सेवाकार्याच्या आडून धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचा बुरखा फाडला. कम्युनिस्टांसोबत तर त्यांनी थेट पंगा घेतला. हा संघर्ष एवढा टोकाला गेला की कम्युनिस्ट नेत्यांना संघासोबत शांतता करार करावा लागला.
मच्छिमारी करून आपली उपजीविका करणाऱ्या तळागाळातील सामान्य स्वयंसेवकांमध्ये आपल्या अंगीकृत कार्याबद्दल एवढी कर्मठता कशी काय आली असावी? भास्कररावांची तपश्चर्या व कल्पकता आणि मुख्य म्हणजे त्यामागील सामान्य माणसांबाबत त्यांच्या मनात असलेली अपरंपार करुणा हेच यामागचे खरे कारण आहे.
प्रांत प्रचारक या नात्याने तब्बल ४० वर्षे भास्कररावांनी केरळला केवळ जागृतच केले नाही, तर त्याला प्रतिकार करण्यासाठी सिद्ध बनवले. आजही संघाची ‘नित्यसिद्ध हिंदूशक्ती’ ही कल्पना केरळमध्ये पाहण्यास मिळते.
हृदयविकारासारखा गंभीर आजार असूनही भास्कररावांनी जवळपास १४ वर्षे वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची धुरा सांभाळली. पूर्वांचलासह संपूर्ण वनवासी क्षेत्रात आश्रमाच्या कार्याचा आज जो विस्तार दिसत आहे, तो भास्कररावांच्या अथक परिश्रमाचे फलित म्हणावे लागेल.
वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी केरळमधील कोचीतच अखेरचा श्वास घेतला. २००२ साली भास्करराव गेले, त्या दिवशी केरळमधील तळागाळातील महिला-पुरुष ढसाढसा रडत होते. आपला खंबीर पाठीराखा गेल्याची त्यांची भावना होती.
तळागाळातील सामान्य लोकांच्या डोळ्यात एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने पाणी येणे ही सहज गोष्ट नाही. पण भास्कररावांनी ती साध्य करून दाखवली. समाजाच्या उपेक्षित घटकाला जागृत केले, त्याला आत्मविश्वास मिळवून दिला आणि स्नेहपूर्ण प्रेमाच्या बळावर त्याला हिंदुत्वाच्या धाग्यात जोडले, तर समाजाचे एक अभेद्य संघटन उभे राहू शकते, हे केरळने सिद्ध केले आहे.
केरळमध्ये एकेका जिल्ह्याची होणारी लाखालाखांची शिबिरे हे या नित्यसिद्ध शक्तीचे प्रगट रूप म्हणता येईल. के. भास्करन नावाच्या व्यक्तीचा हा चमत्कार आहे.
या दिवशी भास्कररावांचे स्मरण होण्याची प्रक्रिया मात्र आजही कायम आहे. कारण भारतातील हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भास्कररावांचे स्मरणदेखील कार्यासाठी ऊर्जा देणारे आहे.
आजच्या त्यांच्या स्मृतिदिनादिवशी आपण तेवढे तरी करूया…
ॐ भास्कराय नमः |
१९१९ : संघ प्रचारक कर्मवीर भास्करराव कळंबी यांचा जन्म
(ब्रह्मदेशची राजधानी रंगूनजवळील दास गावात — सध्याचे म्यानमार)
(मृत्यू : १२ जानेवारी, २००२)
━━━━━━━━━━━━━━━━━━
📜 घटना : - १८६४: एका भीषण चक्रीवादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० लोक ठार आणि शहर उद्ध्वस्त झाले.
- १९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
- १९४८: अश्गाबात येथील भूकंपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.
- १९५५: पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
- १९६२: ‘डॉ. नो’ हा पहिला जेम्स बाँड चित्रपट प्रदर्शित झाला.
- १९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
- १९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.
- १९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🕯️ मृत्यू : - १९२९: भारतीय पुजारी वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन.
(जन्म : ८ ऑगस्ट १८७६) - १९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिंदी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन.
(जन्म : १५ सप्टेंबर १९०५) - १९९१: इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन.
(जन्म : २२ एप्रिल १९०४) - १९९२: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नामवंत मुत्सद्दी, बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.
(जन्म : ११ सप्टेंबर, १९१२) - १९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन.
(जन्म : २५ डिसेंबर १९२६)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌺 जन्म : - १८९०: तत्त्वज्ञ व ‘हरिजन’चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.
- १९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म.
(मृत्यू : १० मे १९९८) - १९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म.
(मृत्यू : २६ एप्रिल १९८७) - १९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म.
(मृत्यू : ३ नोव्हेंबर २०१२) - १९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.
(मृत्यू : २३ सप्टेंबर, २०१९)






