Tag sugar industry news and updates

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

Sugarcane Festival by SugarToday Magazine

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

एकसष्ठी निमित्त विशेष लेख…

Ravikant Patil, 61st Birthday Year

माझे परमस्नेही श्री. रविकांत पाटील यांची सन २०२५ मध्ये वयाची एकसष्ठी सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या साखर उद्योगातील योगदानाबद्दल लेख लिहिण्याच्या विचाराने मूळ धरले व तशा प्रकारचे विचार सुरू झाले. त्यादृष्टीने मला त्यांचे विषयी असलेल्या माहिती व्यतिरिक्त माहिती जमा करण्याचे काम मी सुरू केले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी संपर्क…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

CM Agitation

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

दिलीप पाटील : वाढदिवस विशेष

Dilip Patil Birthday

दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी नेते आहेत. ते सहकारी साखर कारखाने आणि नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त… धोरण…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

Select Language »