साखर आयुक्तालयाच्या ८ पैकी ६ प्रादेशिक विभागांचे नेतृत्व आता महिलांच्या हाती!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे । शुगरटुडे
महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक सहसंचालक (RJD) पदांवर महिला अधिकाऱ्यांचे झालेले हे वर्चस्व प्रशासनातील ‘महिला सक्षमीकरणा’चे (Women Empowerment) आणि समान संधीचे एक अत्यंत अभूतपूर्व उदाहरण ठरले आहे!
नवनियुक्त ४ महिला अधिकाऱ्यांसोबतच आधीपासून कार्यरत असलेल्या २ महिला अधिकाऱ्यांमुळे राज्यातील ८ पैकी तब्बल ६ प्रादेशिक विभागांची (७५%) धुरा आता महिला अधिकारी समर्थपणे सांभाळत आहेत.

साखर क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय महिला अधिकारी:
नवनियुक्त प्रादेशिक सहसंचालक व सहसंचालक:

  1. डॉ. प्रगती बागल – प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे
  2. डॉ. शुभांगी गोंड – प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड
  3. उज्ज्वला पळसकर – प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर
  4. साधना देशमुख – सहसंचालक (उपपदार्थ)

आधीपासून कार्यरत असलेल्या प्रादेशिक सहसंचालक:

  1. सीमा पांडे – प्रादेशिक सहसंचालक (साखर), नागपूर
  2. नीलिमा गायकवाड – प्रादेशिक सहसंचालक (साखर), अमरावती

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भापर्यंत पसरलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील साखर पट्ट्यांचे नियंत्रण आज महिला अधिकाऱ्यांच्या हाती असणे, हे त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर राज्याने दाखवलेला दृढ विश्वास दर्शवते.


हे यश महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील महिलांसाठी अत्यंत भूषणावह असून, जिद्द आणि कौशल्याच्या बळावर महिला कोणत्याही आव्हानात्मक क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवू शकतात, हे यातून सिद्ध होते.


दरम्यान, IFGE चे प. विभाग संचालक दिलीप पाटील यांनी साखर आयुक्तालयातील सर्व महिला अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे आणि महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »