गोदाकाट ऑर्गनिक अग्रोमध्ये नऊ जागांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परभणी : जवळा झुटा, ता. पाथरी, जि. परभणी येथील गोदाकाट ऑर्गनिक अग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या जागरी पावडर निर्मिती कारखान्यात विविध सहा प्रकारच्या पदांसाठी एकूण नऊ जागांची भरती करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत ई-मेलद्वारे अर्ज पाठवावेत, असे आवाहन कंपनीने केले आहे.

प्रतिदिन ७५० टन ऊस गाळप क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी सुरक्षा अधिकारी एक, असिस्टंट इंजिनिअर अथवा मेकॅनिकल इंजिनिअर एक, फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट एक, टर्बाइन अटेंडंट दोन, ऑईलमन अथवा टर्बाइन हेल्पर तीन आणि आरओ प्लांट ऑपरेटर एक, अशी पदे भरली जाणार आहेत.

सुरक्षा अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असून, सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. अभियंता पदासाठी डीएमई, बी.ई. मेकॅनिकल अथवा बीओई पात्रता आणि पाच वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट पदासाठी आयटीआय अथवा बीओई फर्स्ट क्लास पात्रता व पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.टर्बाइन अटेंडंट आणि आरओ प्लांट ऑपरेटर पदांसाठी आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

ऑईलमन अथवा टर्बाइन हेल्पर पदासाठी आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.सर्व पदांसाठी संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे. साखर कारखान्यातील अनुभवी सेवानिवृत्त कामगारांच्या अर्जांचाही सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे जाहिरातीत नमूद आहे.पात्र उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज godakatorganic@gmail.com या ई-मेलवर पाठवावा.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »