साखर स्वस्तात देण्याच्या आमिषाने तीन लाखाला गंडवले

बार्शी : तालुक्यातील आगळगाव येथील एका दुकानदारास साखरेच्या गोण्या स्वस्तात देतो, असे सांगून अज्ञाताने ३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत संताजी विजय जाधव (वय ४५, रा. आगळगाव, धनगरवाडी) यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली…









