Category पश्चिम महाराष्ट्र

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; मुकादमास पोलिस कोठडी

सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एका मुकादमास अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश  देण्यात आला आहे. हणमंत नामदेव आजबे, (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे…

साखर व्यापाऱ्याची कार फोडल्याप्रकरणी गुन्हा

सांगली : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून एका साखर व्यापाऱ्याच्या कारची आज्ञाताने तोडफोड केली आहे. ही घटना येथील संजयनगरमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) या साखर व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.…

‘एआय’ उसाला वरदान ठरणार : बिपीन कोल्हे

Bipin Kolhe

अहिल्यानगर : ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने…

गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली.…

हार्वेस्टर यंत्र बहुपयोगी बनवा : शुगर टास्क फोर्सची सूचना

Sugar Task Force Meeting

ऊसतोड मजुरांच्या कोयता मुक्तीचा विचार कराः डॉ. सोमिनाथ घोळवे पुणे : शुगर टास्क फोर्स कोअर कमिटी तर्फे पुण्यामध्ये “ऊस तोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणी- समस्या व निवारण” ह्या विषयावर चर्चा मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. देशातील ही एकमेव…

‘सोमेश्वर’च्या सभासदांसाठीचा ‘एआय’ मेळावा उत्साहात

Someshwar Sugar

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या हेतूने  शेतकऱ्यांमध्ये ‘एआय’संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथील कोऱ्हाळे बुद्रक येथे ‘एआय’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा डॉ.…

‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ…

कृष्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी बाजीराव सुतार 

कऱ्हाड –  साखर उद्योग क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी (एमडी) साखर उद्योग क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार असलेले बाजीराव सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.…

मामांवर आबा पडले भारी; ‘आदिनाथ’वर निर्विवाद वर्चस्व

Adinath Sugar

सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या ‘आदिनाथ संजीवनी पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वच्या सर्व २१ जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवलेला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ यांच्यावर पराभवाची…

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

Select Language »