Category आणखी महत्त्वाचे

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

जळगाव जिल्ह्यात तीन एकर ऊस जळून खाक

जळगाव :  वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे राज्यात शॉर्टसर्किटमुळे मागील काही दिवसांत उसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना पुन्हा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे घडली आहे. येथील विजयकुमार शेंडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली…

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत.…

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या…

ऊसतोड मुकादमावर टोळीचा जीवघेणा हल्ला

गंगाखेड : येथील ऊसतोड मुकादमावर आठ जणांच्या टोळीने चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील लहुजीनगर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यलप्पा व्यंकटी पवार (रा. लहुजीनगर) या ऊसतोड…

मनसेच्या वतीने रेणापूर तालुक्यात ऊस परिषद

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी ऊस परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्‌घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग…

रडू नको मुला !

W R Aher Poem

चिमणी येईल |चिवचिव करील||दाणा पाणी घेईल |खेळविल तुला ||१|| वारा येईल |गाणे गाईल||नाचून घेईल |खेळविल तुला ||२|| झाड बोले|सावली देईल ||ताप हरील|खेळविल तुला ||३|| फुल बोलले |गंध देईल तुला ||रंग देईल तुला |खेळविल तुला ||४|| मग बोले सृष्टी |काढी त्याची…

‘FOI’ चा कृषी संशोधकांच्या आंदोलनाला पाठींबा

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या फेलोशिप, शिष्यवृत्ती वगैरे च्या मागण्यांसाठी कृषी संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या गुडलक चौकात, भर पावसात, आठ दिवस आंदोलन केलं होते. त्याला उपस्थित राहून आम्ही पाठिंबा दिला, अशी माहिती…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

Select Language »