Category आणखी महत्त्वाचे

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळून खाक; अडीच लाखांचे नुकसान

सांगली(वाळवा) : वाळवा तालुक्यातील शिगाव येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने, सर्व मजूर ऊसतोडीसाठी शेतात गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये मजुरांचे…

राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

Helping Hand

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे…

अरे माणसा माणसा

aher poem

अरे माणसा माणसा |जै डोंबारी तारेवर||तै समतोल नजर|मग मिळेल भाकर||१|| अरे माणसा माणसा|खोटं कधी बोलू नये||सुगरणीच्या घरट्याला|खोपा, कधी म्हणू नये||२|| अरे माणसा माणसा|निसर्गाची कला न्यारी||जरि शेंग ती काटेरी| सागरगोटे अंतरी||३|| अरे माणसा माणसा|माझ्या जीवाचा मैतरं||आहे मोठा जादूगार|त्यांवर माझी मदार||४|| अरे माणसा…

साखर कारखाना हे शेती संस्कृतीचे आधुनिक रूप : इंद्रजित भालेराव

मंगळवेढा: “माणसाने शिकारीऐवजी पेरून खाण्याची सुरुवात केली, तेव्हापासून शेती संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. आजच्या काळात साखर कारखाना हे या प्राचीन शेती संस्कृतीचेच आधुनिक रूप आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंद्रजित भालेराव यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) मंगळवेढा शाखेच्या वतीने…

ओव्हरलोड ऊस वाहतुकीला आळा घाला, अन्यथा कारखान्यांवर कारवाई

Sugarcane Crushing

अहिल्यानगर : जिल्ह्यातील धोकादायक आणि ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साखर कारखानदारांना कठोर इशारा दिला आहे. “ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांनाही आता जबाबदार धरले जाईल,” असे स्पष्ट करत त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.…

चंदगडमध्ये ऊसउत्पादकांची ३० कोटींची लूट; ‘स्वाभिमानी’ आक्रमक

चंदगड: ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे वसूल केली जाणारी ‘खुशाली’ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चंदगड तालुक्यातील कारखान्यांना इशारा दिला आहे. या लुटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे.…

आर्थिक शिस्तीत ‘नॅचरल शुगर’ अव्वल

natural sugar

व्हीएसआयचा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन’ पुरस्कार जाहीर धाराशिव: रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याने २०२३-२४ या वर्षासाठीचा मानाचा ‘(कै.) कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ पटकावला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (VSI) सोमवारी (२९ डिसेंबर) होणाऱ्या वार्षिक सभेत हा पुरस्कार…

पालकांच्या वाढत्या अपेक्षांची शिक्षकांनी दखल घ्यावी -इंजि. वाळू आहेर.

W R Aher

नाशिक : काळ बदलत चालला, तसे पालकांच्या शिक्षकांकडून असलेल्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी पालकांच्या या वाढत्या अपेक्षांची दखल घ्यावी, असे प्रतिपादन साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ इंजि. वाळू आहेर यांनी केले. जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड (…

उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Sugarcane Cultivation

कोल्‍हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय?संजय कोळी…

Select Language »