चला जरा वृंदावनाला जाऊ!

हरी बासरीने गीत गाईल |राधा राणी झोक्यावर खेळेल||मोहन प्रेमाने झोका देईल|राधाकृष्णाचा जागर होईल||चला जरा वृंदावनाला जाऊ||१|| शेकडो गवळी दादांना भेटू|तयांची ती माखन चोरी पाहू||बाके बिहारीचे दर्शन घेऊ|खुप सुंदर सजावट पाहू||चला जरा वृंदावनाला जाऊ||२|| तेथे संतांचा कायम निवास|हरीनामाचा तयांनाही ध्यास||यमुनेच्या घाटावरती जाऊ|स्नान…










