गंगापूर साखर कारखाना चेअरमनपदी कृष्णा पाटील डोणगावकर

गंगापूर – गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कृष्णा पाटील डोणगावकर, तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब गावंडे यांची बिनविरोध निवड झाली.

गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृह परिसरात शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
आ. प्रशांत बंब व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने २० जागांवर विजय. संजय जाधव हे बिनविरोध विजयी झाले होते. पॅनलप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर हेच चेअरमन होतील असा अंदाज बांधला गेला होता.
या वेळी नवनिर्वाचित संचालक संजय जाधव, दिलीप बनकर, सुरेश मनाळ, प्रवीण वालतुरे, कचरू शिंदे, बाबूलाल शेख, मधुकर साळुंखे, शेषराव साळुंखे, रामभाऊ दुबिले, प्रल्हाद निर्फळ, तुकाराम दादा कुंजर, शेषराव पाटेकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप, देवचंद राजपूत, नामदेव दारुंटे, काशिनाथ गजहंस, मायाबाई दारुंटे, शोभा भोसले, कारखान्याचे माजी चेअरमन कुंडलिकराव माने, भागवतराव काळे, संतोष माने, चांगदेव गायकवाड यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.