मंडलिक कारखान्याकडून मयतांच्या वारसांना आर्थिक मदत

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुरगूड : हमीदवाडा, ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चार सभासदांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी संचालक शिवाजीराव इंगळे, विश्वासराव कुराडे, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, सत्यजित पाटील, वीरेंद्र मंडलिक, पुंडलिक पाटील, नेताजी पाटील, प्रा. संभाजीराव मोरे, तुकाराम ढोले, कृष्णा शिंदे, विष्णू बुवा, संचालिका मंगल तुकान, प्रतिभा पाटील, कामगार प्रतिनिधी सर्जेराव पाटील, विनय रेडेकर, सर्जेराव चव्हाण, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सेक्रेटरी आर. बी. बोंगार्डे तसेच सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याचे सभासद संजय तोरसे (सोनगे), विष्णू सुतार (पिंपळगाव बु.), शशिकांत फासके (उंदरवाडी), दिलीप पाटील (निढोरी) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना हे धनादेश देण्यात आले आहेत.  

तसेच कारखान्याच्या मयत कामगारांनाही  प्रत्येकी २ लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार कर्मचारी बाजीराव हळदकर (मुरगूड), शंकर आडोळे (बोळावी), रामदार लोहार (कापशी से.), नंदकुमार तोरसे (खडकेवाडा), सुरेश भोसले (हमीदवाडा) यांच्या वारसांना व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »