राजगंगा शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उमरगा : राजगंगा शुगर मिल प्रा. लि. (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना लि.), समूद्राळ (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

कारखान्याची दररोज ६,००० मे. टन गाळप क्षमता असून, ३२ मे. वॅट सहवीजनिर्मिती तसेच ४०० KLPD डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प कार्यरत आहेत. या कारखान्यात खालील पदे तातडीने भरावयाची आहेत.

रिक्त पदे :

  1. चीफ इंजिनिअर – १ पद
  2. चीफ केमिस्ट – १ पद
  3. चीफ अकाउंटंट – १ पद
  4. परेचेस मॅनेजर – १ पद
  5. ईडीपी मॅनेजर – १ पद
  6. सिव्हिल इंजिनिअर – १ पद
  7. सुरक्षा अधिकारी – १ पद

संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसोबत किमान ३ ते ५ वर्षांचा संबंधित साखर कारखान्यातील अनुभव अपेक्षित आहे. पात्र उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, सध्याचा पगार दाखला आदी कागदपत्रांसह अर्ज करावा.

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसांच्या आत कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावा. अर्जासाठी rajgangamillhr@gmail.com या ई-मेलवरही संपर्क साधता येईल. मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड व पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी येताना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे.

टीप : मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »