स्वामी समर्थ शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहमदनगर : स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड, माळेवाडी-रामडोह, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी विभागात बॉयलर हाऊस फिटर ग्रेड, सेंट्रिफ्यूगल फिटर ग्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन ग्रेड, स्विच बोर्ड ऑपरेटर आणि वेल्डर ग्रेड या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

तसेच उत्पादन विभागात कंट्रोल मेट, एफ.एफ.डी. ऑपरेटर, सल्फिटेशन मेट, असिस्टंट पॅनमन, बॅच टाईप मशीन ऑपरेटर आणि कंटिन्युअस मशीन ऑपरेटर या पदांवरही नियुक्ती करण्यात येणार आहे.

याशिवाय शेतकी विभागात केन यार्ड सुपरवायझर आणि फील्ड बॉय या पदांसाठीही पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांसाठी ५ ते १० वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक असून शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी, आयटीआय, आयटीआय इलेक्ट्रिशियन, पदवी किंवा संबंधित तांत्रिक पात्रतेनुसार निश्चित करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, सध्याचा पगार, अपेक्षित पगार आणि मोबाइल क्रमांक नमूद करून अर्ज ई-मेलद्वारे पाठवावा. अर्ज hr.sssail01@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »