‘सहकार शिरोमणी’कडून ऊस तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पंढरपूर : येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. सन २०२५-२६ या गाळप हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर तसेच ऊस तोडणी – वाहतूक उपसमिती चेअरमन मोहन नागटिळक यांच्या हस्ते ऊस तोड – वाहतूकदारांचे करार करण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी संचालक राजसिंह माने, प्र. कार्यकारी संचालक पी. डी. घोगरे, मुख्य शेती अधिकारी आर. जे. नरसाळे, शेती अधिकारी पी. आर. थोरात, ऊस पुरवठा अधिकारी एच. आर. गिड्ढे व सर्व विभाग प्रमुख यांच्यासह वाहतूक कंत्राटदार धनाजी कवडे, शंकर डोंगरे, रत्नाकर गायकवाड, अशोक गायकवाड, अर्जुन बागल, मधुकर ताटे, गणेश माने, करण बागल, बीड भागातील बैलगाडी मुकादम गोपाळ चौरे, दत्तात्रय चौरे, चंद्रकांत चौरे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.  

प्रारंभी प्र. कार्यकारी संचालक घोगरे यांनी आगामी ऊस गळीत हंगामाच्या तयारीविषयी माहिती दिली. नोंद दिलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस वेळेत गाळप करण्याच्या दृष्टीने सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा उभारण्यात येत आहे. सर्वांनी सहकार्य करून हा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »