संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पैठण : तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे, नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २८ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर संचालक यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

आता संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीला वेग आला आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी व नवीन संचालक मंडळाच्या निवडणूक होईपर्यंत कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते व फुलंब्री येथील सहाय्यक निबंधक व्ही.पी रोडगे यांची प्रशासक पदावर नियुक्ती करण्याचा आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक शरद जरे यांनी दिला आहे.
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तुषार सिसोदे यांच्या ताब्यात असून कारखाना एका खासगी कंपनीकडे अनेक वर्षांपासून चालवण्यासाठी देण्यात आला होता.

संचालकांच्या कार्यकाळात विद्यमान चेअरमन तुषार सिसोदे यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी माजी चेअरमन आप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक संचालक मंडळांनी केली आहे. कारखान्यामध्ये स्लीप बॉय म्हणून काम पासून चेअरमन ते आमदार झालेले राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री व संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थकांसह जिल्हा परिषद माजी सभापती विलास बापू भुमरे यांनी एकनाथ कारखाना ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »