शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

मुंबई – येथे “शुगर, इथेनॉल व बायोएनर्जी ” या विषयावर चिनी मंडी ग्रुप कडून १२ आणि १३ जून २०२६ रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवाराचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे यांनी केले व दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शुगर इंडस्ट्रीज परिवार ची स्थापना कै. अविनाश कुटे पाटील यांनी मार्च 2015 मध्ये केली होती परन्तु कोरोना काळात त्यांचे दुर्दैवी निधन झाले . त्यांच्या पश्चात सदर कमिटीने श्री.दिलीप वारे यांची या ग्रुपचे एडमीन म्हणून नियुक्ती केली .
श्री दिलीप वारे यांनी अतिशय वेळ देऊन व तळमळीने या परिवार साठी काम केले, व ग्रुप सदस्यांची संख्या प्रचंड अशी वाढवली . ग्रुपच्या स्थापनेस या वर्षी 11 वर्ष पूर्ण झालेत , प्रत्येक वर्धापन दिनास श्री. वारे वेगवेगळे उपक्रम घेत असतात, जसे की साखर व्यासायाशी निगडित विषय घेऊन व्हाट्सआप वर ऑनलाइन व्याख्यान माला , दररोज एका वक्त्याचे सायंकाळी 7 वाजता व्हाट्सआप ग्रुपवर व्याख्यान प्रसारित होत असते, दररोज किंवा सदस्यांच्या सोयीनुसार सायंकाळी 6 वाजता शुगर विषयक चर्चासत्र ( प्रश्न मंजुषा कार्यक्रम ) व त्यास ग्रुपमधील तज्ञ मान्यवर उत्तरे देतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमधील सर्व शुगर विषयक पोस्ट संकलित करून दररोज ग्रुपवर शुगर विषयक बातम्यांचा अपडेट देत असतात.

या भव्य कॉन्फरन्समध्ये आपल्या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ चे काम, कार्य, उद्देश , व संघटन आणि सातत्य पाहून, त्यांनी या परिवाराला कार्यक्रमाचे ‘Associate Partner’ म्हणून समाविष्ट केले आणि या परिवाराचा एक मोठा गौरव केला.
आज ११,५०० पेक्षा अधिक सदस्य जोडून, हा परिवार महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कदाचित देशातीलही सर्वात मोठा व्हाट्सआप ग्रुप ठरला आहे. एक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून काय साध्य होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबरीने आज आपला हा सोशल मीडिया ग्रुप चा लोगो व ग्रुप अभिमानाने उभा आहे, हे यावरून दिसून येते.
हे सर्व यश, हे सर्व श्रेय अर्थातच शुगर इंडस्ट्रीज परिवार मधील सर्व सदस्यांना जाते. मी फक्त तुमचा एक प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होतो , असे दिलीप वारे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक साखर कारखान्यांचे अधिकारी , खातेप्रमुख , चेअरमन ,कार्यकारी संचालक , जनरल मॅनेजर या सर्व मान्यवरांची भेट झाली.
सर्वांनी आपल्या सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि आम्ही आपल्या ग्रुपवरील पोस्ट आवर्जून बघतो असेच सांगितले , या ग्रुपमुळे अनेकांना रोजगार मिळतो तसेच अद्ययावत माहिती मिळते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले .






