खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर उसाची लागवड!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नागरिकांचा प्रशासनाविरोधात अनोखा आंदोलन

सांगली: रस्त्यांच्या दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. खराब झालेल्या रस्त्यावर उस लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. खड्डे, चिखल आणि धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांना याचा फटका बसत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली; मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळेच संतप्त नागरिकांनी हा अनोखा मार्ग अवलंबत रस्त्यावर उसाची लागवड करून निषेध नोंदवला.

या आंदोलनात गावातील अनेक पुरुष, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »