श्री क्रांती ‘शुगर’मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

अहिल्यानगर : देवीभोयरे, ता. पारनेर येथील श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती जाहीर करण्यात आली आहे. दररोज ३७५० टन गाळप क्षमता आणि १२.५ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प असलेल्या या कारखान्यात अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
उपलब्ध पदांमध्ये एचआर मॅनेजर (१ पद) आणि सुपरिटेंडेंट (शेतकी) (१ पद) यांचा समावेश आहे. एचआर मॅनेजर पदासाठी एमबीए (एचआर) शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, या पदासाठी महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर सुपरिटेंडेंट (शेतकी) पदासाठी कृषी पदवी, संबंधित कामाचा अनुभव आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे.
दोन्ही पदांसाठी किमान ३ वर्षांचा साखर कारखान्यातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन कारखान्याच्या प्रशासनाने केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी shreekrantisugar.powerltd@gmail.com या ई-मेल अथवा
कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे.



