‘बेस्ट शुगर फॅक्टरी 2026’ किताब ‘मांजराच्या’ नावावर!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

डेक्कन शुगरकडून गौरव; 100 टक्के हार्वेस्टरने ऊसतोड करणारा पहिला कारखाना

लातूर : जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखान्याने कामगिरीचा नवा मानदंड प्रस्थापित करत ‘डेक्कन शुगर बेस्ट शुगर फॅक्टरी 2026’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. शुगर इंडस्ट्रीज परांवर ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या या सन्मानामुळे राज्यभरातून कारखान्याचे कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, ऊसतोडणी प्रक्रियेत 100 टक्के हार्वेस्टरचा वापर करणारा देशातील हा पहिलाच साखर कारखाना ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, कार्यक्षम व्यवस्थापन आणि उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने घेतलेल्या पुढाकारामुळे हा सन्मान मिळाल्याचे सांगितले जात आहे.

कारखान्याने गेल्या काही वर्षांत ऊस गाळप, साखर उत्पादन आणि कामकाजात सातत्याने प्रगती साधली आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करून विश्वास संपादन केला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी कारखान्याचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच प्रगती कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »