Tag sugar news

धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास कोटीचा गंडा

धाराशिव : भामट्याने साखर कारखान्याचा चेअरमन असल्याचे भासवून एका अधिकाऱ्यास तब्बल एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार धाराशिवमध्ये १५ एप्रिल ते १७ एप्रिलच्यादरम्यान घडला आहे. यासंदर्भात धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

‘आदिनाथ’च्या २१ जागांसाठी उद्या मतदान

adinath sugar

करमाळा : येथील आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, दि. १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण २१ जागांसाठी हे मतदान होत आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची…

‘सह्याद्री’ का अभेद्य राहिला?

Balasaheb Patil Sahyadri SSK

बाळासाहेब पाटील यांचा संयम आणि लढावू बाणा ठरला महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘सह्याद्री’ हा ‘अभेद्य’च राहिला. सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे ‘सह्याद्री’चे ‘शिलेदार’ हे बाळासाहेबच आहेत, यावर सभासदांनीच मोहोर उमटवली. विधानसभेच्या पराभवानंतर विरोधकांनी केलेल्या एकीमुळे या…

अजितदादांऐवजी आता पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी

Ajit Pawar Babasaheb Patil

साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी समितीची पुनर्रचना मुंबई : साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी स्थापन केलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जुनी समिती बदलून, सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नवी समिती नुकतीच स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी व…

विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

Vikhe-Thorat

अहिल्यानगर :  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे…

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

Select Language »