Tag sugarcane news

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने…

सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

Sahyadri Sugar Election

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव…

एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन…

हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

Sakhar Sankul

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट…

‘सह्याद्री’साठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून प्रत्यक्षात सकाळीच सुरुवातही झाली आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर हे  मतदान होत आहे. सह्याद्री सहकारी…

देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

Sugar Market

पुणे  : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये…

ऊस वाहतूक आणि विम्याची गरज

Sugarcane Transport Insurance

भारतातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पिकांची शेतातून साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक करताना अनेक गंभीर आव्हानांना तोंड देतात. खराब रस्ते, वाहनांवर अतिरिक्त भार आणि वाहनांची अपुरी देखभाल यामुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा…

ऊसउत्पादक, मजुरांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करा: अजित पवार

मुंबई : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ…

Select Language »